नथुराम विनायक गोडसे (मे १९, इ.स. १९१०; बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - नोव्हेंबर १५, इ.स. १९४९) हा महात्मा गांधी चा मारेकरी होता. त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे गांधीच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. गोडसे हा पुण्यातील हिंदुत्ववादी होता. तसेच तो हिंदू महासभेचा सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) माजी सदस्य होता. १९४७ च्या भारताच्या फाळणीच्या वेळी गांधींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असे त्याचे मत होते. त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत हत्येचा कट रचला.
एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला ८ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे दोन पुत्र, मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी क्षमायाचना केल्या होत्या, परंतु त्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी फेटाळून लावल्या. गोडसे याला १५ नोव्हेंबर १९४९ रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
नथुराम गोडसे
यामागील विज्ञान आणि इतिहास.