हॅरी हूडिनी तथा एरिक वाइझ (२४ मार्च, १८७४:बुडापेस्ट, हंगेरी – ३१ ऑक्टोबर, १९२६) हा एक जगप्रसिद्ध हंगेरियन-अमेरिकन जादूगार आणि अभिनेता होता. हा साखळदंडातून लीलया स्वतःची सुटका करून घेत असे. लहानपणीच ते आपल्या कुटुंबासह अमेरिकेला स्थायिक झाले आणि तिथेच त्यांनी आपल्या जादूच्या खेळांची सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध फ्रेंच जादूगार रॉबर्ट हुडिनच्या नावावरून आपले टोपण नाव हूडिनी असे ठेवले. हूडिनीला त्यांच्या अद्भुत कौशल्यामुळे जगभरात मोठी कीर्ती मिळाली आणि आजही त्यांचे नाव साहसी करामतींसाठी ओळखले जाते.
हूडिनी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धोकादायक प्रयोग केले. ते विशेषतः स्वतःला साखळदंड, हातकड्या आणि बंद पेटीतून मुक्त करून घेण्यात निष्णात होते. त्यांच्या जलकुंभी प्रयोगात ते एका पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत उलटे टांगले जात आणि त्यातून काही मिनिटांत सुटका करून घेत असत. या प्रयोगांनी प्रेक्षकांना थक्क केले आणि त्यांना सुटका सम्राट ही पदवी मिळाली. त्यांनी केवळ रंगमंचावरच नव्हे, तर खुल्या मैदानात आणि पुलावरून लटकत असतानाही अशा करामती करून दाखवल्या.
जादूच्या प्रयोगांव्यतिरिक्त हूडिनीvs अनेक मूक चित्रपटांमध्ये काम केले आणि स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था देखील सुरू केली होती. त्यानs विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि ऑस्ट्रेलियात यशस्वीरीत्या विमान उड्डाण करणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी तो एक होता.
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात हूडिनी यांनी खोट्या आध्यात्मिक गुरूंचा आणि भोंदू लोकांचा पर्दाफाश करण्याचे काम हाती घेतले. त्याकाळी अनेक लोक मृतांशी संवाद साधण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करत असत. हूडिनी यांनी आपल्या जादूच्या ज्ञानाचा वापर करून या भोंदूगिरीमागील शास्त्रीय कारणे जनतेसमोर आणली. यामुळे त्यांचे अनेक आध्यात्मिक गुरुंसोबत मतभेद झाले, परंतु त्यांनी आपले सत्य शोधण्याचे काम सुरूच ठेवले.
हूडिनी यांचे निधन १९२६ मध्ये पोटाच्या विकाराने झाले. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक कथा प्रचलित असल्या तरी, वैद्यकीय अहवालानुसार त्यांचे निधन अपेंडिसायटिसमुळे झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निधनानंतरही त्यांची जादूची कला आणि सुटका करून घेण्याचे तंत्र आजही अनेक नवीन जादूगारांना प्रेरणा देते. हूडिनी यांनी जादूच्या विश्वात जे योगदान दिले, ते आजही अतुलनीय मानले जाते आणि त्यांचा इतिहास जागतिक मनोरंजन क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.
हॅरी हूडिनी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!