हॅरी पॉटर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हॅरी पॉटर

हॅरी पॉटर ही जे.के. रोलिंग ह्या ब्रिटिश लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात हॅरी पॉटर हा जादूगार मुलगा आपला मित्र रॉन विजली व मैत्रिण हर्माइनी ग्रेंजर ह्यांच्यासोबत हॉगवॉर्ट्‌ज जादू आणि तंत्र विद्यालय नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत शिकत असतो. त्याच्या साहसाची, जादू कौशल्याची व लॉर्ड वोल्डेमॉर्ट ह्या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे.के. रोलिंगने वर्णन केली आहे.

१९९७ साली हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफेर्स स्टोन या नावाने प्रकाशित झाले व त्यानंतर हॅरी पॉटरची लोकप्रियता वाढतच राहिली. जून २००८ अखेरीस हॅरी पॉटर पुस्तकांच्या ४० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व हॅरी पॉटर शृंखला ६७ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे. हॅरी पॉटरच्या एकूण सात कादंबऱ्या मंजुषा आमडेकर यांनी मराठीत भाषांतरित केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →