हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हा हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवा चित्रपट आहे जो चित्रपट १९ नोव्हेंबर २०१०ला प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटचे डेवीड येट्स ने दिग्दर्शन केले व वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सने वितरण केले. हा चित्रपट जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज पुस्तकावर आधारीत आहे.
ह्या चित्रपटातील प्रमुख कलाकार हॅरी पॉटरच्या भुमिकेत डॅनियेल रॅडक्लिफ व हॅरीचे सर्वोत्तम मित्र म्हणुन हरमायनी ग्रेंजरच्या भुमिकेत एम्मा वॉटसन आणि रॉन विजलीच्या भुमिकेत रूपर्ट ग्रिंट आहेत. हा चित्रपट हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स चित्रपटानंतरचा भाग आहे व ह्या चित्रपटानंतरचा भाग हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २ जो या मालिकेतील शेवटचा चित्रपट आहे.
ह्या चित्रपटात हॅरी, रॉन आणि हरमायनी हे तिघे, त्यांना डंबलेडोरने दिलेले मिशन पूर्ण करण्यासाठी निघतात, ज्या मध्ये त्यांना व्होल्डेमॉर्टच्या हॉक्र्स्जचा शोध करुण नाश करावयाचा असतो. ज्यामुळे लॉर्ड व्हॉल्डेमॉर्टचा नाश करता येईल. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी १९, २००९ रोजी सुरू झाले व जून १२, २०१० रोजी चित्रीकरण संपले. नोव्हेंबर १९, २०१० रोजी हा चित्रपट आयमॅक्स व इतर चित्रपटांच्या प्रकारात प्रदर्शित झाला.
ह्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकुन $३३ कोटी डॉलर उत्पन्न कमवले, ज्यामुळे हा चित्रपट हॅरी पॉटर चित्रपटांच्या उत्पन्न यादीत तिसऱ्या स्थानावर आला. २०१० वर्षातील प्रदर्शित चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट पहिल्या स्थानावर आला, आणि आज पर्यंत प्रदर्शित चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या यादीत हा चित्रपट ८व्या स्थानावर आला. एकूण ह्या चित्रपटाने $९६.०३ कोटी उत्पन्न कमवले ज्यामुळे २०१० वर्षातील प्रदर्शित सर्व चित्रपटांच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आला. टॉय स्टोरी ३ पहिल्या स्थानावर आणि एलीस इन वॉन्डरलॅन्ड दुसऱ्या स्थानावर होते. सर्व हॅरी पॉटर चित्रपटांच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आला, पहिल्या स्थानावर हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २ व दुसऱ्या स्थानावर हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन चित्रपट होते. आज पर्यंत सर्वात जास्त उत्पन्न कमवनाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट ३७व्या स्थानावर आला.
ह्या चित्रपटाला ८३वे ऑस्कर पुरस्कार मध्ये दोन नामांकने प्राप्त झाली, बेस्ट व्हिजुअल एफेक्ट्स (सर्वोत्तम चित्र प्रभाव) आणि बेस्ट आर्ट डारेक्शन (सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन)
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १
थोडक्यात पण महत्त्वाचे.