हॅमिल्टन (ऑन्टारियो)

या विषयावर तज्ञ बना.

हॅमिल्टन (ऑन्टारियो)

हॅमिल्टन (इंग्लिश: Hamilton) हे कॅनडा देशाच्या ऑन्टारियो प्रांतामधील एक मोठे शहर आहे. हॅमिल्टन शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या पश्चिम काठावर वसले आहे. २०११ साली हॅमिल्टन शहराची लोकसंख्या सुमारे ५.१९ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ७.२१ लाख होती. हॅमिल्टन कॅनडामधील ९वे सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे.

हॅमिल्टन आग्नेय कॅनडामधील अत्यंत घनदाट लोकवस्तीच्या गोल्डन हॉर्सशू नावाने प्रसिद्ध असलेल्या भूभागामध्ये टोराँटोच्या ७० किमी नैऋत्येस वसले असून ते एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार हॅमिल्टन निवासासाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक होते. राष्ट्रकुल खेळाची सर्वात पहिली आवृत्ती १९३० साली ब्रिटिश साम्राज्य खेळ ह्या नावाने हॅमिल्टनमध्येच भरवण्यात आली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →