एडमंटन ही कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे (कॅल्गारीखालोखाल) शहर आहे. एडमंटन शहर आल्बर्टाच्या मध्य भागात उत्तर सास्काचेवान नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ८.१२ लाख लोकसंख्या असलेले एडमंटन कॅनडामधील पाचवे मोठे शहर व सहावे मोठे महानगर आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे एडमंटन हे उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उत्तरेकडील एकमेव महानगर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एडमंटन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.