हृदय

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हृदय

हृदय हा अवयव अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो. स्नायूनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते. इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ हा हृदय संबंधी आलेल्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील कार्डिया (हृदय) शब्दाशी आहे. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय हृदयस्नायूनी बनलेले असते. हृदयस्नायू अनैच्छिक असून त्यांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म दर्शकाखाली पट्टे दिसतात. हृदय प्रामुख्याने हृदयस्नायूनी आणि थोड्या संयोजी उतीनी बनलेले असते. सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते. सरासरी सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील कालखंडामध्ये हृदय पंचवीस लक्ष वेळा अकुंचन पावते. स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते.

अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय म्हणजे एक लहान आकाराची पिशवी किंवा आकुंचन पावणारी नलिका असते. यामधून शरीरास प्रथिने,मेदाम्ले आणि कर्बोदके वाहून नेली जातात. कीटकांचे रक्त रंगहीन असून त्यामधून श्वसनवायूंचे वहन होत नाही. संधिपाद खेकड्यासारख्या प्राण्यामध्ये आणि कोळी आणि मृदुकाय गटातील नळ, म्हाकूळ आणि ऑक्टोपस सारख्या प्राण्यामधील रक्तामध्ये तांबे असलेले हीमोसायनिन नावाचे श्वसनवायू वाहून नेणारे निळ्या रंगाचे रक्तद्रव्य असते. हीमोसायनिन युक्त रक्ताचे वहन या प्राण्यांच्या हृदयामार्फत होते. (पहा रक्त)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →