कीटक संधिपाद प्राणी वर्गातील कायटिनचे बाह्य आवरण असलेल्या या बहुपेशीय प्राण्यांचे शरीर डोके, वक्ष आणि पोट अशा तीन प्रमुख भागांनी बनलेले असते. वक्षास पायांच्या तीन जोड्या असतात. डोळे बहुभिंगी असून डोक्यावर दोन शृंगिका असतात. सर्वाधिक विविधता असलेला हा वर्ग आहे. आजपर्यंत सुमारे दहालाख कीटकांच्या प्रजातीचे वर्गीकरण झाले आहे. हा आकडा आजपर्यंत वर्गीकरण न झालेल्या कीटकांच्या सुमारे पन्नास टक्के असावा.
प्राणिसृष्टीमध्ये सहा ते दहा दशलक्ष जाति असाव्यात. त्यापैकी नव्वद टक्के बहुपेशीय प्राणी आहेत. कीटक पृथ्वीवरील सर्व प्रदेशांत आढळतात. सागरातील कीटकांची संख्या नगण्य आहे. सागरामध्ये संधिपाद प्राण्यापैकी कवचधारी प्राण्यांचे प्राबल्य अधिक आहे.
कीटकांच्या जीवनक्रमामध्ये थोडा फार फरक आहे. पण बहुतेक सर्व कीटकांची पहिली अवस्था अंडे ही आहे. कीटकांच्या वाढीस प्रत्यास्थित बाह्य आवरणाच्या मर्यादेमुळे वाढ अनेक टप्प्यांमध्ये होते. अंडे, अळी, कोश आणि पूर्ण वाढ झालेला कीटक. अशा टप्प्यांमध्ये अळी, कोश आणि पूर्ण वाढ झालेला कीटक यांच्या शरीररचना, अन्न, आणि अधिवास भिन्न असतो. पूर्ण बदल होण्यासाठी कोशावस्थेची गरज असते. काही कीटकांच्या वाढीच्या अवस्था अपूर्ण असतात. या प्रकारास अपूर्ण परिवर्तन म्हणतात. अपूर्ण परिवर्तन असलेल्या कीटकामध्ये कोशावस्था नसते. क्रमाक्रमाने त्यांच्या वाढीच्या अवस्था येत राहतात. पॅलिओझोइक कालखंडामध्ये असलेले कीटकांचे जीवाश्म ५५-७० सेमी आकाराचे आढळले आहेत. कीटकांमधील विविधता सपुष्प वनस्पतींच्या वाढीबरोबर विकसित झाली आहे.
कीटकांची हालचाल प्रामुख्याने पायांमुळे व पंखांमुळे होते. पाण्यातील कीटक पोहू शकतात. कीटकाना असलेल्या सहा पायांमुळे शरीराचा तोल उत्तमप्रकारे सांभाळला जातो. त्यांचे पाय डाव्या आणि उजव्या बाजूस टेकून बदलत्या त्रिकोनामध्ये ते शरीर पृष्ठभागावर टेकवतात. कीटक हे एकमेव उड्डाणक्षम अपृष्ठवंशी प्राणी आहेत. अनेक कीटकांच्या पहिल्या वाढीच्या अवस्था पाण्यात पूर्ण होतात(उदा० डास, चतुर). पाण्यातील अवस्थेमध्ये क्लोमांच्या साहाय्याने श्वसन होते. काहीं प्रौढ कीटकांच्या शरीरांमध्ये पाण्यामध्ये राहण्यासाठी बदल झाले आहेत. निवळी (वॉटर सट्रायडर) सारखे कीटक पाण्यावर चालू शकतात. बहुतांश कीटक एकांडे असतात. मधमाशा, मुंग्या आणि वाळवी हे समुदायाने राहणारे कीटक आहेत. सुसूत्रपणे सहसंबंध असलेल्या मोठ्या समुदायामध्ये असे कीटक राहतात. कुंभारीण हा वास्प जातीचा कीटक अंडी आणि अळ्यांची काळजी घेतो. कीटकांचे संप्रेषण अनेक प्रकारानी होते. नरकीटक मादीच्या कामगंधाने कित्येक किलोमीटरपर्यंत आकर्षित होतात. क्रिकेट सारखा कीटक पंख परस्परांवर घासून मादीस आकर्षित करणे आणि दुसऱ्या नरास पिटाळून लावण्याचे काम करतो. काजवा प्रकाश संदेशाच्या साहाय्याने मादीबरोबर संपर्क साधतो.
मानवाच्या दृष्टीने बहुतेक कीटक उपद्रवी असल्याने त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीटकनाशके वापरली जातात. काही कीटक पिकांचे पाने, फुले आणि फळामधील रस शोषून नुकसान करतात. काहीं कीटक मानव आणि पाळीव पशूंचे रक्त शोषतात. रक्त शोषणारे आणि मानवास चावणारे कीटक अनेक रोगांचे वाहक आहेत. त्यातील काही पाळीव प्राण्यांच्या रोगांचे वाहक आहेत. कीटकांशिवाय फुलांचे परागीभवन घडून येत नाही. कीटकांच्या साहाय्याने झालेल्या परागीभवनामुळे पिकांचे उत्पन्न अधिक येते. आपण आपल्या अन्नासाठी कीटकांवर अवलंबून आहोत. कीटकभक्षी कीटकांमुळे उपद्रवी कीटकांची संख्या नियंत्रित राहते. रेशीम कीटक आणि मधमाशा पालन यामधून रेशीम आणि मध यांचे उत्पन्न मिळते.
कीटक विविधता
प्रत्यक्षात असलेला कीटक बहुविधतेचा आकडा नक्की करणे कठीण असले तरी चवदा ते अठरा लाख कीटक पृथ्वीवर असावेत असा अंदाज आहे. हा आकडा सर्व जैवविविधतेच्या वीस टक्के एवढा आहे. दरवर्षी असलेल्या कीटकांच्या यादीमध्ये वीस हजार नव्या कीटकांची भर पडते आहे. अर्थात मोठ्या वेगाने हे काम चालू राहिले तर भविष्यात हा आकडा कमी होईल. प्राणिसृष्टीतील आठ लाख पन्नास हजार ते दहा लाख कीटकांचे वर्गीकरण झाले आहे. कीटकांच्या तीस गणांतील चार गणांमध्ये सहा लाख ते दहा लाख कीटक आजपर्यंत सामावलेले आहेत. हे चार गण म्हणजे कोलिओप्टेरा, डिप्टेरा, हायमनोप्टेरा आणि लेपिडोप्टेरा. भुंग्याच्या (कोलिओप्टेरा)गणामध्ये जेवढे कीटक आहेत तेवढी सर्व एकत्रित कीटकांची संख्या होते.
कीटक
थोडक्यात पण महत्त्वाचे.