हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९४० व १९४४चा अपवाद वगळता) हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
या विषयातील रहस्ये उलगडा.