हिल सिटी हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. हे ग्रॅहम काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४०३ इतकी होती.
ग्रॅहॅम काउंटीतील सगळ्या जुने गाव असलेल्या हिल सिटीमध्ये पहिली वस्ती १८७६ मध्ये झाली. येथे वस्ती करणाऱ्यांपैक एक असलेल्या डब्ल्यू.आर. हिल या व्यक्तीचे नाव या गावाला दिले गेले हिल सिटीमधील पहिले टपाल कार्यालय सप्टेंबर १८७८ मध्ये स्थापन करण्यात आले आणि १८८०मध्ये हे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र झाले.
हिल सिटी (कॅन्सस)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.