हिमानी अशोक सावरकर (इ.स. १९४७ - ११ ऑक्टोबर, इ.स. २०१५ या गोपाळ गोडसे यांच्या कन्या, नथुराम गोडसे यांची पुतणी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायण सावरकर यांच्या स्नुषा होत्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय हिंदू महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या माध्यमांतून हिमानी सावरकर यांनी काम केले. २००४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक तर, २००९ मध्ये कोथरुडमधून विधानसभेची निवडणूक लढविली होती.
हिंदू महासभेद्वारे महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे काही शहरांत पुतळे उभारण्याचा प्रस्ताव होता, त्यास हिमानी सावरकर यांनी विरोध केला होता. असे पुतळे उभारले गेल्यास नथुराम गोडसेच्या प्रतिमेबाबत चुकीचा संदेश जाऊन गांधींचा मारेकरी या प्रतिमेचा परिणाम वाढेल, असे त्यांचे म्हणणे होते.
हिमानी सावरकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.