हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धर्म वा जीवनपद्धती होय. आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा हिंदू असा उल्लेख करतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ 'शाश्वत मार्ग' असा होतो. निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद, नास्तिकता, आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात. अनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्म हा विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांंचे संमिश्रण आहे, की ज्याचा कोणीही संस्थापक नाही.
हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धती, मते, तत्त्वज्ञान आणि संप्रदायांचा समावेश आहे. अनुयायांचा संख्येच्या आधारावर हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील हिंदू धर्मीयांची संख्या साधारण १ अब्ज १२ कोटी एवढी आहे. बहुसंख्यांक हिंदू हे भारत, नेपाळ आणि मॉरिशस ह्या देशांत राहतात. हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत असे म्हणले जाते. त्यापैकी मुख्य त्रिदेव आहेत जे सृष्टीचे उत्पत्ती, पालनपोषण व संहार करतात: १) ब्रह्मदेव, २) विष्णूदेव, ३)भगवान महादेव.
हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे, ज्याचे अंदाजे १.२० अब्ज अनुयायी आहेत, किंवा जागतिक लोकसंख्येच्या सुमारे १५%, हिंदू म्हणून ओळखले जातात. भारत, नेपाळ, मॉरिशस आणि बाली, इंडोनेशियामध्ये हा सर्वात व्यापकपणे व्यक्त केलेला विश्वास आहे. दक्षिण आशियातील इतर देशांमध्ये, आग्नेय आशियामध्ये, कॅरिबियन, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, युरोप, ओशनिया, आफ्रिका आणि इतर प्रदेशांमध्ये हिंदू समुदायांची लक्षणीय संख्या आढळते.
हिंदू धर्म
थोडक्यात पण महत्त्वाचे.