हायडेलबर्ग (जर्मन: Heidelberg) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यामधील एक शहर आहे. जर्मनीच्या नैऋत्य भागात नेकार नदीच्या काठावर वसलेले हे शहर येथील पुरातन किल्ला व विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. येथील हायडेलबर्ग विद्यापीठाचा जर्मनीतील तसेच जगातील प्राचीन विद्यापीठात समावेश होतो. हायडेलबर्ग मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बाँबहल्ल्यापासून वाचलेल्या अनेक पुरातन इमारती आहेत. त्यामुळे मध्ययुगीन जर्मन् शहर कसे होते याचे हायडेलबर्ग उत्तम उदाहरण आहे.
हायडेलबर्ग शहरात अमेरिकन सैन्याचे मोठे ठाणे आहे व अमेरिकेचे मोठे वैद्यकिय स्थळ आहे. जर्मनीतील सर्वाधिक इंग्रजी शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक केंद्र म्हणूनही हायडेलबर्गची चांगलीच ओळख आहे. मानहाईम व लुडविग्सहाफन ही मोठी औद्योगिक केंद्रे येथून जवळच आहेत.
हायडेलबर्ग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.