हसीन दिलरुबा हा २०२१ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. हा विनिल मॅथ्यू दिग्दर्शित आहे आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिला आहे. यात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या भूमिका आहेत.
हा चित्रपट २ जुलै २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. समीक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिसाद मिळाला. हसीन दिलरुबा त्या वर्षी नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला हिंदी चित्रपट म्हणून उदयास आला आणि नंतर २२ देशांमध्ये टॉप १० मध्ये पोहोचला. फिर आइ हसीन दिलरुबा नावाचा सिक्वेल ९ ऑगस्ट २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
हसीन दिलरुबा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.