विक्रांत मॅसी (३ एप्रिल १९८७) हा एक भारतीय अभिनेता आहे, जो हिंदी दूरदर्शन, हिंदी चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये काम करतो. धूम मचाओ धूम मधील आमिर हसनच्या भूमिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि धरम वीर, बाबा ऐसा वर ढूंढो आणि कुबूल है मधील भूमिकांमुळे तो नावारूपाला आला.
हिंदी दूरदर्शनवरील यशानंतर, मॅसीने लुटेरा (२०१३) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि दिल धडकने दो (२०१५) आणि हाफ गर्लफ्रेंड (२०१७) सारख्या चित्रपटांमधील सहाय्यक भूमिकांतून तो दिसला. ए डेथ इन द गुंज (२०१७) आणि छपाक (२०२०) मधील मुख्य भूमिकांसाठी त्याने समीक्षकांची प्रशंसा मिळवली. मिर्झापूर (२०१८) आणि ब्रोकन बट ब्यूटीफुल (२०१८-२०१९) या लोकप्रिय वेब मालिकांतील त्याच्या प्रमुख भूमिकांसाठी त्याने खूप प्रशंसा मिळवली.
विक्रांतने रोमँटिक विनोदी चित्रपट डॉली किट्टी और वो चमकते सितारे (२०२०) आणि रहस्य थरारपट हसीन दिलरुबा (२०२१) यांसारख्या प्रशंसित चित्रपटांत काम केले आहे.
विक्रांत मॅसी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.