रूपा गांगुली

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रूपा गांगुली

रूपा गांगुली (बंगाली:রূপা গাঙ্গুলী) या एक भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायिका आणि राजकारणी आहेत. गांगुलीचा जन्म २५ नोव्हेंबर १९६६ रोजी समरेंद्र लाल गांगुली आणि जुथिका गांगुली यांच्या पोटी एका संयुक्त कुटुंबात झाला.

बीआर चोप्रा यांच्या महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेतील द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. आपल्या अष्टपैलु अभिनय आणि उच्चारण रूपांतरामुळे बॉलीवूडच्या शबाना आझमीला टॉलीवूडचे उत्तर म्हणून अनेकदा त्या ओळखल्या जातात. त्यांनी मृणाल सेन, अपर्णा सेन, गौतम घोष आणि रितुपर्णो घोष या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. गायनातील रवींद्र संगीत प्रकारात त्यांनी गायिका म्हणून तसेच शास्त्रीय नृत्यांगना म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. गांगुली यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन 'बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार' यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे. त्यांनी 'पश्चिम बंगाल मोशन पिक्चर आर्टिस्ट फोरम' या सिने कलाकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेच्या सरचिटणीस आणि उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये, भारताच्या राष्ट्रपतींनी गांगुली यांचे राज्य सभेतील खासदार म्हणून नामांकन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →