कादंबिनी बोस गांगुली (१८ जुलै १८६१ ते ३ ऑक्टोबर १९२३) या भारतातील वैद्यकीय डॉक्टर होत्या. आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी घेऊन सराव करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. १८८४ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या गांगुली ह्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर त्यांनी स्कॉटलंडमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतात यशस्वी वैद्यकीय सराव सुरू केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील त्या पहिल्या महिला वक्त्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कादंबिनी गांगुली
यामागील विज्ञान आणि इतिहास.