मोहम्मद हसन खान (जन्म १६ ऑक्टोबर १९९८) हा पाकिस्तानात जन्मलेला क्रिकेटपटू आहे. त्याने २१ एप्रिल २०१६ रोजी लिस्ट अ क्रिकेटमध्ये सिंधकडून बलुचिस्तानविरुद्ध २०१६ पाकिस्तान कप स्पर्धेत पदार्पण केले. पदार्पणापूर्वी त्याची २०१६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात निवड झाली होती. त्याने क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून १० फेब्रुवारी २०१७ रोजी २०१७ पाकिस्तान सुपर लीगमध्ये ट्वेंटी-२० पदार्पण केले. त्याने ३ ऑक्टोबर २०१७ रोजी २०१७-१८ कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये कराची व्हाइट्सकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले.
डिसेंबर २०१७ मध्ये, त्याची २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.
एप्रिल २०१८ मध्ये, त्याची २०१८ पाकिस्तान कपसाठी खैबर पख्तूनख्वाच्या संघात निवड झाली.
३ जून २०१८ रोजी, ग्लोबल टी२० कॅनडा स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीसाठी खेळाडूंच्या मसुद्यात त्याची एडमंटन रॉयल्सकडून खेळण्यासाठी निवड झाली.
त्याने बीबीएल २०२५/२६ स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्सकडून पदार्पण केले. २०२६ पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो नव्या फ्रँचायझी हैदराबाद किंग्जमेनमध्ये सामील झाला.
हसन खान
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!