निपुण धनंजय (२८ सप्टेंबर, २०००:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने १४ डिसेंबर २०१८ रोजी २०१८-१९ प्रीमियर लीग स्पर्धेत सिंहालीज स्पोर्ट्स क्लब संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याची २०१८ च्या १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघात निवड झाली होती. त्याने १९ फेब्रुवारी २०१९ रोजी २०१८-१९ एस.एल.सी. ट्वेन्टी२० स्पर्धेत सिंहालीज स्पोर्ट्स क्लबकडून ट्वेन्टी२० प्रकारात पदार्पण केले. जानेवारी २०२० मध्ये २०२० च्या १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघाच्या कर्णधारपदी त्याची निवड करण्यात आली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निपुण धनंजय
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!