हल्लीकर गाय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हल्लीकर गाय

हल्लीकर हा कर्नाटकात आढळणारा गोवंश असून याचा शेती आणि कष्टाच्या कामासाठी चांगला उपयोग होतो. बैलाचा उंच खांदा, लांब आणि पाठीमागे, आत वाळलेली शिंगे, मोठं डोकं, काटक आणि उंच शरीर, राखाडी आणि कधीकधी काळा रंग ही या गोवंशाची ओळख आहे.

अमृतमहाल प्रजातीची निर्मिती यांच्या पासून झाली असे म्हणतात. अमृतमहाल सोबतच या प्रजातिला राजाश्रय मिळाला होता. टिपू सुलतानाने इंग्रजांच्या विरोधातील लढाईत सामान वाहून नेण्यासाठी या प्रजातीचा वापर केला होता. मैसूर, तुमकुर हसन या प्रांताला हल्लीकर म्हणून ओळखले जाते. आणि याच प्रांतात ही प्रजाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. आणि यावरूनच यांचं नाव सुद्धा हल्लीकर असे पडले. सामान्य पण नियमित खुराक या प्रजातीसाठी पुरेसा आहे. जरी अल्प दूध देणाऱ्या अमृतमहाल गाईची निर्मिती हल्लीकर गोवंशा पासून झालेली असली तरी पण मुळात हा गोवंश दूध देण्यात पण उत्तम आहे. शेती उपयुक्त बैल आणि दुग्धजन्य पदार्थ ही या गोवंशाची विशेषता मानली जाते.

कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये सुद्धा या प्रजातीचा प्रसार आणि वापर चांगला झाला.

सण २००० मध्ये भारतीय डाक विभाग तर्फे या प्रजातीचा फोटो असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →