सम्राट हर्षवर्धन किंवा हर्ष (इ.स. ५९० – इ.स. ६४७) हे उत्तर भारतातील प्रसिद्ध सम्राट होते. ते पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते. राज्यवर्धननंतर इ.स. ६०६ मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहिती मिळते. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्षे राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीर, खान्देश, नेपाळ आणि बल्लभीपुरपर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी आर्यावर्ताला सुद्धा आपल्या अधीन केले. हिंदू धर्मातील सूर्य देवाची आराधना करून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला.
हर्षवर्धनांचे वर्धन साम्राज्य (१०,००,००० चौरस कि.मी. क्षेत्रफळ)
हर्षवर्धन
या विषयावर तज्ञ बना.