हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा (११ ऑक्टोबर, १९२३:कानपूर, उत्तर प्रदेश, भारत – १६ ऑक्टोबर, १९८३:प्रिन्सटन, न्यू जर्सी, अमेरिका) हे भारतीय गणितज्ञ होते.
डॉ.हरिश्चंद्र (११ ऑक्टोबर, इ.स. १९२३ - इ.स. १९८३) हे भारतीय गणितज्ञ होते.
हरिश्चंद्रांचा जन्म ११ ऑक्टोबर, इ.स. १९२३ रोजी कानपूर येथे झाला. इ.स. १९४३ मध्ये अलाहाबाद विश्वविद्यालयातून एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी इ.स. १९४७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी मिळवली.
केंब्रिज येथे डॉ. हरिश्चंद्राना पॉल डिरॅक, वेइल आणि शेव्हले हे गणितज्ञ भेटले. त्यांच्याबरोबर त्याना गणितातल्या लाय ग्रुप्सवर संशोधन केले. इ.स. १९५० ते इ.स. १९६३ या काळात ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते. इ.स. १९५४ मधे त्यांना अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे कोल पारितोषिक मिळाले. इ.स. १९६२ मध्ये ते अमेरिकेतल्या न्यू जर्सी विद्यापीठात आमंत्रित प्राध्यापक होते. पुढे इ.स. १९६८ ते इ.स. १९८३ या काळात डॉ. हरिश्चंद्र यांची अमेरिकेतल्याच प्रिन्सटन विद्यापीठात न्यूमन प्रोफेसर या अध्यासनावर नेमणूक झाली. याच काळादरम्यान ते अमेरिकेच्या नॅशनल अॅकॅडमीचे आणि इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.
डॉ.हरिश्चंद्रांना भौतिकशास्त्राची आवड होती. डॉ.डिरॅक यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स या पुस्तकावर भाळून त्यांनी भौतिकशास्त्राकडे जावे असे ठरवले होते. पण पुढे प्रत्यक्ष डॉ.डिरॅक भेटल्यावर त्यांच्या सूचनेनुसार ते गणिताकडे वळले.
हरीश चंद्र
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.