गेल ऑमव्हेट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गेल ऑमव्हेट

डॉ. गेल ऑम्वेट (Gail Omvedt, २ ऑगस्ट १९४१ - २५ ऑगस्ट २०२१) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार होत्या. या महात्मा फुले, आंबेडकरवाद व मार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक होत्या. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. इ.स. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून देखील काम केले.

दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →