हरिराव होळकर (१७९५ - १८४३), औपचारिकपणे महाराजाधिराज राज राजेश्वर सवाई श्री हरिराव होळकर नववे बहादूर , हे मध्य भारतातील इंदूर संस्थानाचे राजे होते.हे १७ एप्रिल, १८३४ पासून २४ ऑक्टोबर, १८४३ दरम्यान सत्तेवर होते. हे तुकोजीराव होळकर यांचे नातू होते.
१८१९मध्ये यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतरच्या सत्तासंघर्षात बंड केल्याच्या आरोपाखाली मल्हारराव तिसरे आणि त्यांच्या आई कृष्णाबाई यांनी हरिरावांना महेश्वर येथे तुरुंगात टाकलेले होते. मल्हाररावांच्या सद्दीनंतर कृष्णाबाई यांनी मार्तंडराव यांना दत्तक घेण्याचा घाट घातल्यावर इंदूरमधील सरदारांनी त्याविरुद्ध बंड पुकारले. हे पाहून कृष्णाबाईने हरिरावांना सत्ता देण्याचे कबूल केले. या नंतर कृष्णाबाईंनी हरिरावांना दत्त घेतले व १७ एप्रिल १८३४ रोजी जुना राजवाडा पॅलेसमध्ये औपचारिकपणे सिंहासनावर बसवले.
या रस्सीखेचीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तटस्थ राहिली. कालांतराने हरिरावांची प्रकृती बिघडल्याने ब्रिटिश रेसिडेंटने त्यांच्यावर आपला वारस नियुक्त करण्याचा आग्रह धरला. २ जुलै, १८४१ रोजी हरिरावांनी इंदूरजवळी जोतशिखरा येथील जहागिरदार बापूजीराव होळकर यांचा १ वर्षांचा मुलगा खंडेराव होळकर याला दत्तक घेतले. जेव्हा हरिराव प्रकृतीअस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले तेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी मार्तंड राव यांच्या समर्थकांनी गोंधळ करू नये म्हणून खंडेरावांना आव्हान देण्यापासून रोखण्यासाठी सक्षम मंत्र्यांची नियुक्ती करून दिली.
हरिराव होळकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.