हरिभाऊ बागडे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हरिभाऊ किसन बागडे (१७ ऑगस्ट १९४४) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक राजकारणी, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व विधानसभेचे १४ वे अध्यक्ष आहेत. त्यांनी २०१४ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये फुलंब्री मतदारसंघामधून विजय मिळवला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बागडे यांनी १९८५ साली पहिल्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवली आणि तीत ते विजयी झाले. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९९५ ते १९९९ दरम्यान बागडे हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते.

११ नोव्हेंबर २०१४ रोजी १३व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बागडेंची बिनविरोध निवड झाली.



ते सध्या राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →