भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्यात भारताच्या वाटेला ८२% लोकसंख्या ७५% तृणधान्याखालील क्षेत्र व ६९% बागायत क्षेत्र आले.
स्वातंत्र्योत्तर काळात भारत शेतीप्रधान देश असून ही पीएल ४८० करारानुसार १९५५ मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला. हरितक्रांती म्हणले की, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे नाव नजरेसमोर येतो. पुणे येथील शनिवारवाडा येेथील जाहीर सभेत "जर या दोन वर्षात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही, तर या शनिवारवाडा समोर मी जाहिर फाशी घेईन" अशी भिष्मप्रतिज्ञा केली. आणि अल्पावधीतच त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. महाराष्ट्रात १९७२ एवढा भिषण असा दुष्काळ यापूर्वी कधीही पडला नव्हता,अशा भिषण दुष्काळावरही त्यांनी मात केली.
हरितक्रांती
या विषयातील रहस्ये उलगडा.