हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय ही जगातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे जीवन स्पष्ट करणारी ग्रंथमाला असून विसाव्या शतकातील तत्त्वज्ञानातील ते महत्त्वाचे योगदान मानले जाते. त्यामुळे तत्त्वज्ञान निर्मितीत मोठी भर पडली आहे. पॉल ऑर्थर श्लीप या तत्त्ववेत्त्याने ही ग्रंथमाला १९३९ मध्ये सुरू केली; ते या मालेचे १९८१ पर्यंत संपादक होते. त्यानंतर लेविस एडविन हान हे १९१८ ते २००१ पर्यंत संपादक होते आणि रंडल ऑक्सिएर हे विद्यमान संपादक आहेत. मराठीत या धर्तीवर मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान हे पुस्तक रचल्याचे या पुस्तकाचे प्रस्तावना लेखक प्रा. दि.य. देशपांडे यांनी म्हंटले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.