हनुवन्तिया हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या खंडवा जिल्ह्यात असणारे एक गाव आहे. रस्त्याने नागपूर-बैतुल-खांडवा मार्गे येथे पोचता येते. हे नागपूरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर आहे. हे गाव नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या इंदिरा सागर बांध या सरोवराच्या अत्यंत जवळ आहे. इंदिरा सागर जलाशय हा सुमारे ९०० वर्ग किमी इतक्या क्षेत्रात पसरला आहे. या जलाशयात सुमारे ९२ बेटे आहेत जी जलाशय पातळीपेक्षा उंचावर आहेत. हे सध्या भारतातील एक मोठे व अग्रणी असे जल व साहस पर्यटनस्थळ मानल्या जाते. मध्य प्रदेश राज्याचा जलमहोत्सव ज्या ठिकाणी भरविण्यात येतो त्या अनेक ठिकाणांपैकी हे एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हनुवंतिया
या विषयावर तज्ञ बना.