अढुळा नदी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अढुळा नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी अकोले गावाच्या उत्तरेस उगम पावते. ती पट्टा व महाकाली च्या उतारावरून धावते.सुमारे १५ मैल (२४ किमी) पूर्वेकडे वाहते. यादरम्यान ती समशेरपूर दरीतून वाहते. ती नंतर सुमारे १५० फूट (४६ मी) खाली कोसळते व खडकाळ जमिनीतून वाहते. त्यानंतर ती संगमनेरजवळ समतल भागात पोचते व मग दक्षिणेकडे वळून मग प्रवरा नदीला मिळते.

या नदीची एकूण लांबी सुमारे ४० किमी इतकी आहे. पावसाळ्यात या नदीला फारच त्वरेने पूर येतो.याचे कारण ती डोंगराळ प्रदेशातून वाहते व तिचा प्रवाह वेगवान आहे. समशेरपूर या गावानंतर या नदीवर अनेक बंधारे व सांडवे बांधण्यात आले आहेत ज्यायोगे या नदीचे पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो.

अढळा नदीवर देवठाण, ता. अकोले, अहमदनगर येथे १TMC क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →