अडाण धरण

या विषयातील रहस्ये उलगडा.

अडाण धरण हे मातीच्या व दगडाच्या भरावाचे धरण आहे. ते महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड अडाण नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे.

या धरणाची उंची पायव्यापासून सुमारे ३०.१३ मी (९८.९ फूट) आहे. याची लांबी ७५५ मी (२,४७७ फूट) इतकी आहे. या धरणाचे साठवणक्षमता १,४२८ किमी३ (५.०४×१०१३ घन फूट) असून पूर्ण भरण क्षमता ७८,३२०.०० किमी३ (२.७६५८४५×१०१५ घन फूट) इतकी आहे.हे धरण गोदावरीच्या खोऱ्यात येते.

महाराष्ट्र शासनाचे मानकांनुसार हा एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे.यातील ६९.६६ मिक्युमी पाणी शेतीच्या सिंचनासाठी तर ११.१२९ मिक्युमी पाणी हे पिण्याच्या वापरासाठी आहे.यातील पाण्याचा मृत साठा ११.०७ इतका आहे तर, ७९८ चौ. किमी इतके याचे जलसंधारण क्षेत्रफळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →