हत्तीरोग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हत्तीरोग ( लिम्फॅटिर फायलेरियासिस (एलएफ)) हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय (अवयव)ˌ वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालचाल करणेही अवघड होवून बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. हत्तीरोग हा “क्युलेक्स विचकि फॅसिएटस’ नावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरिई असे म्हणतात त्या अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चाव्याद्वारे पसरतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते.

हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्‍यक आहे.

इ.स. १९५५ पासून भारत देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो. भारतात हा रोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश , असाम, कर्नाटक इत्यादी राज्यात आढळतो.

५ ऑगस्ट हा हत्तीरोग दिन म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →