डेंग्यू ताप

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डेंग्यू ताप

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

भारतात १९६३ साली कलकत्त्यात डेंगीची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरे, शहरे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याची वृत्ते येऊ लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →