मलेरिया

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मलेरिया

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या नावाच्या परजीवी मूळे होतो व डासांद्वारे तो पसरतो .

याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे.

मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.



प्लाझमोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहित होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले.

इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.

इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९७ मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 20 ऑगस्ट हा सर रोनाल्ड रॉस यांचा जन्मदिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.मलेरिया तापात थंडी वाजून ताप येणे आणि पुन्हा तीन चार दिवसांनी ताप येणे यासाठी शरीरात हिमोझाईन हा विषारी पदार्थ दिसून येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →