सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुदबांधव (२६ मे, इ.स. १९०२ - २७ जानेवारी, इ.स. १९६८) हे मराठीतले एक कवी, व ध्येयवादी नाटककार होते. त्यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते.
स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या असत.
लिखित साहित्याबरोबर स.अ. शुक्ल यांना धर्मशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान या विषयांतही रस होता खूप वाचावे आणि थोडे पण सकस लिहावे अशी त्यांची वृत्ती होती. कविवर्य स.अ. शुक्ल हे त्या काळी मोठे प्रस्थ होते. अनेक भावगीतांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होते व त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. काव्य मागितले आणि लगेच मिळाले तर तो निर्माता तरी का नाही खूश होणार? त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही प्रचंड होता. ग. दि. माडगूळकर यांची कुंडली बघून हा पोरगा माझी जागा घेणार हे भविष्य त्यांनी वर्तवले होते आणि पुढे अगदी तसेच झाले.
स.अ. शुक्ल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.