जी.एन. जोशी (६ एप्रिल, इ.स. १९०९ - सप्टेंबर २२, १९९४) हे मराठीतले भावगीत गायक होते. रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते.
जोशी व्यवसायाने वकील होते. एचएमव्ही कंपनीमधील रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकाऱ्याने जोशी यांना नोकरी दिली व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारी केले. जोशी, रूपजी व वसंतराव कामेरकर या अधिकाऱ्यांच्या त्रयीने या भावगीतांना प्रसिद्धी दिली. त्यांनी अनेक नवीन कलाकार हेरून त्यांच्याकडून नेमकी श्रोत्यांना आवडतील अशी गाणी करून घेतली. या शिवाय मराठी व हिंदी चित्रपट संगीतात सुद्धा त्यांनी काम केले. जोशी एचएमव्ही मध्ये ४० वर्षे काम केले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जोशी हे एचएमव्हीतील महत्वाचे अधिकारी समजले जात.
जी.एन. जोशी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.