स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाराष्ट्रातील कोल्हापूर स्थित एक शेतकरी संघटना आहे. या संघटनेची स्थापना खासदार राजू शेट्टी यांनी केली होती.
जानेवारी २०१४ पर्यंत, ही संघटना स्वाभिमानी पक्ष या नावाने शिवसेना आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या सत्ताधारी महाआघाडीचा भाग होती.
२८ सप्टेंबर २०१५ रोजी, २००५ पासून ऑडिट केलेले बॅलन्स शीट आणि आयटी रिटर्न कागदपत्रे सादर न केल्यामुळे नोंदणी गमावलेल्या महाराष्ट्रातील १६ पक्षांत याचा देखील समावेश होता. सबब या संघटनेने आपले अधिकृत निवडणूक चिन्ह गमावले.
एकेकाळी एनडीएशी युती करणारे राजू शेट्टी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर टीकाकार झाले, ज्यामुळे त्यांना २०१७ मध्ये युती सोडावी लागली. नंतर त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारशी युती केली. परंतु हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्याकडून मोठ्या पराभवानंतर हे पाऊल उलटे पडले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.