स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (इंग्लिश: Statue of Liberty) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ फ्रान्सकडून अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उद्घाटन करण्यात आले. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेऊन उभ्या असलेल्या एका स्त्रीचा हा पुतळा अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो.
जुन्या काळात युरोपातून बोटीने अमेरिकेत येणाऱ्या लोकांना अमेरिकेचे पहिले दर्शन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याद्वारे होत असे. आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.
१५१ फूट उंच असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ("July IV MDCCLXXVI") ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे. पुतळ्याची पाया धरून उंची ३०५ फूट असून पुतळ्याच्या मुकुटात ज्या ७ खिडक्या आहेत, त्या जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये जुलेस जोसेफ लेफेब्व्रेचे 'ला वेरेत' हे चित्र 'स्वातंत्र्यदेवतेचा पुतळ्याशी' मिळतेजुळते आहे. २.४ मिलिमीटर जाडीच्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे.
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.