स्वर्णलथा (२९ एप्रिल १९७३ - १२ सप्टेंबर २०१०) एक भारतीय पार्श्वगायिका होती. जवळपास २२ वर्षांच्या कारकिर्दीत (१९८७ ते तिच्या मृत्यूपर्यंत), तिने तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, हिंदी, उर्दू , उडिया , पंजाबी, बंगाली आणि बडागा यासह अनेक भारतीय भाषांमध्ये १०,००० गाणी रेकॉर्ड केली. तिचा सुंदर आवाज हे तिच्या “क्वीन ऑफ टोन्स इन इंडिया” या उपाधीचे कारण आहे.
१९९४ मध्ये तिला करुथथम्मा चित्रपटातील "पोराले पोन्नुथयी" या गाण्याच्या सादरीकरणासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हे गाणे ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले होते.
स्वर्णलथा यांचे १२ सप्टेंबर २०१० रोजी वयाच्या ३७ व्या वर्षी चेन्नई येथे इडिओपॅथिक फुफ्फुसाचा आजाराने निधन झाले.
स्वर्णलता (गायिका)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.