स्वर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

स्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चारायचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ

मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ’, ‘ऑ’ हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत. आता त्यांना आपण "बाराखडी" न म्हणता "चौदाखडी" म्हणू शकतो (शासन निर्णय २००९ नुसार वरील दोन इंग्रजीचे स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणून एकूण स्वर १४ )

वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.

ऱ्हस्व स्वर,

दीर्घ स्वर,

संयुक्त स्वर

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →