मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. देवनागरीतील स्वरांची चिन्हे (स्वरांशचिन्हे उदा. काना, मात्रा, उकार, वेलांटी इ.) व्यंजनांच्या चिन्हांना जोडून तयार होणाऱ्या व्यजनाक्षरांच्या संचाला बाराखडी असे म्हणतात. ह्यांत मराठी भाषेत वापरण्यात येणारे स्वर आणि त्यांपैकी काही स्वरांचे ऱ्हस्व-दीर्घ असे भेद तसेच काही स्वरावलंबी धर्म ह्यांच्या चिन्हांचा समावेश असतो.
मराठीच्या लेखनात परंपरेने अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः ह्यांना स्वर म्हणतात. व्यंजनोच्चारात ह्या प्रत्येक स्वराचा उच्चार मिळवून होणाऱ्या अक्षराच्या उच्चारासाठी व्यंजनांच्या चिन्हाला एक खूण जोडण्यात येते. ती ह्या स्वरांची खूण मानतात. ह्यांपैकी काही खुणांना मराठीत विविध नावे दिलेली आहेत.
मराठीच्या लेखनपरंपरेत स्वर म्हणून गणण्यात आलेल्या ह्या बारा खुणांव्यतिरिक्त काही खुणा परंपरेत वापरलेल्या आढळतात. उदा. ऋ, ऌ ह्यांचा समावेश स्वरांत करण्यात येतो. त्यांची स्वरांशचिन्हे ृ आणि ॢ अशी मानण्यात येतात. तसेच ह्यांना ऱ्हस्व उच्चाराच्या खुणा मानून त्यांच्या दीर्घ उच्चाराच्या ॠ, ॡ (तसेच स्वरांशाच्या ॄ, ॣ) ह्या खुणाही परंपरेत दिलेल्या आहेत. मराठीच्या लेखनपरंपरेत ह्यांपैकी पहिल्या जोडीचा वापर आढळतो. ऋ हे स्वराक्षर तसेच त्याचे स्वरांशचिन्ह ृ हे बऱ्यापैकी वापरात आहे. ॡ ह्या चिन्हाचा वापर मुख्यत्वे शैक्षणिक संदर्भात (अंकलिपीत) दिसतो तर ॢ ह्या स्वरांशचिन्हाचा वापर कॢप्ती अशा एखाद्या शब्दातच आढळतो. ह्या खुणांचा समावेश केल्यास चिन्हांची संख्या वाढून १४ किंवा १६ होते.
संस्कृतमध्ये ऌ आणि ॢ असलेले शब्द भरपूर आहेत. संस्कृृतमध्ये दीर्घ ॡ नाही; मराठीत आहे.
बाराखडी मध्ये प्रामुख्याने बारा स्वर असतात आणि यामुळेच त्याला बाराखडी असे नाव पडले आहे. परंतु आता भारत शासनेच्या नियमानुसार बाराखडीमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांचा समावेश करण्यात आला आहे.
ॲ आणि ऑ ची भर पडल्याने बाराखडी आता १४ खडी झाली आहे.
बाराखडी
या विषयातील रहस्ये उलगडा.