स्लोव्हेनिया क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. ही मालिका १७ आणि १८ मे २०२५ रोजी खेळवण्यात आली.
मालिकेतील पहिले दोन सामने १७ मे रोजी लाचाख येथील वेल्डेन क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले. ऑस्ट्रियाने पहिला सामना ७५ धावांनी आणि दुसरा सामना ११० धावांनी जिंकला.
अखेरचे दोन सामने १८ मे रोजी ग्रात्स येथील बॉलपार्क मैदानावर झाले. ऑस्ट्रियाने तिसरा सामना पाच गडी राखून जिंकून मालिकेत ३–० अशी विजयी आघाडी घेतली. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रियाने २४४/५ धावा केल्यानंतर स्लोव्हेनियाचा डाव ७६ धावांत संपुष्टात आणला आणि १६८ धावांनी विजय मिळवत मालिका ४–० अशी जिंकली.
मालिकेत ऑस्ट्रियाच्या मन्सूर सफीने सर्वाधिक १२१ धावा केल्या, तर उमैर तारिकने सर्वाधिक १० बळी घेतले. स्लोव्हेनियासाठी सुधाकर कोप्पोलूने सर्वाधिक ६३ धावा आणि इजाज अलीने सर्वाधिक आठ बळी घेतले.
स्लोव्हेनिया क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२५
या विषयावर तज्ञ बना.