स्लोव्हेनिया क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२५ हा जून २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. या दौऱ्यात सर्बिया आणि स्लोव्हेनिया यांच्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविण्यात आले. सर्व सामने ७ आणि ८ जून २०२५ रोजी बेलग्रेड येथील लिसिची याराक क्रिकेट मैदानावर झाले.
मार्क पावलोविचने सर्बियाचे, तर इझाझ अलीने स्लोव्हेनियाचे नेतृत्व केले. सर्बियाने पहिला सामना तीन धावांनी, दुसरा सामना नऊ गडी राखून आणि तिसरा सामना २४ धावांनी जिंकत मालिका ३–० अशी जिंकली.
सर्बियाच्या ब्रेथिन पेचिचने मालिकेत सर्वाधिक १६३ धावा केल्या, तर स्लोव्हेनियाकडून इझाझ अलीने सर्वाधिक १४८ धावा केल्या. सर्बियाच्या नेमांजा झिमोन्यिचने मालिकेत सर्वाधिक पाच बळी घेतले.
स्लोव्हेनिया क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२५
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.