स्मृती इराणी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

स्मृती इराणी

स्मृती इराणी (जन्म : २४ मार्च, १९७६, दिल्ली, जन्मनाव : स्मृती मल्होत्रा) ह्या एक भारतीय राजकारणी व माजी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहेत मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मृती यांनी १९९७ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. २००० साली त्यांना स्टार प्लस ह्या वाहिनीवरील एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये आघाडीची भूमिका मिळाली. ह्या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

त्यांनी झुबीन इराणी यांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुले झोहर इराणी, जोश इराणी आणि चॅनेल इराणी आहेत.

२००३ साली स्मृती यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला व २००४ लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणुक लढवली.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधी विरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. परंतु त्यांच्या पराभवानंतर त्या भाजप तर्फे राज्यसभा सदस्य बनल्या.

नरेंद्र मोदी ह्यांच्या पंतप्रधानपदाखालील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणीला मनुष्यबळ विकासमंत्री (Minister of Human Resource Development) हे कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून काँगेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत केले. पुन्हा मोदी यांच्या मत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री , वस्त्रोद्योग मंत्री म्हणून समावेश झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →