स्फुरद (इंग्रजी नाव - फॉस्फरस, संज्ञा P, अणुक्रमांक १५) हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पत्ती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले गेले. आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिग ब्राण्ड याने फॉस्फरसचा शोध लावला. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात १६६९ साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश मिळाले. असे असले तरी फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅवोझिएने इ.स. १७७७ साली सिद्ध केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्फुरद
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.