स्पिरिट एरलाइन्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्पिरिट एरलाइन्स

स्पिरिट एरलाइन्स, इंक. ही एक अमेरिकन अतिकिफायतशी (अल्ट्रा लो-कॉस्ट तथा यूएलसीसी) विमानसेवाकंपनी होती. या कंपनीचे मुख्यालय मायामी महानगर क्षेत्रातील डेनिया बीच, फ्लोरिडा येथे होते. स्पिरिट संपूर्ण युनायटेड स्टेट्स, कॅरिबियन आणि लॅटिन अमेरिकेमध्ये नियोजित उड्डाणे चालवत असे. २०२३ पर्यंत स्पिरिट उत्तर अमेरिकेतील सातवी सर्वात मोठी विमानकंपनी तसेच उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी अतिकिफायतशीर कंपनी होती. स्पिरिटने नोव्हेंबर २०२४ मध्ये चॅप्टर ११ दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता आणि मार्च २०२५ मध्ये आर्थिक पुनर्रचनेनंतर ती यातून बाहेर पडली, परंतु ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा एकदा दिवाळखोरीसाठी अर्ज केला. शेवटी २ मे, २०२६ रोजी ही कंपनी बंद पडली.

स्पिरिट एरलाइन्स, इंक. ही एक डेलावेर कॉर्पोरेशन आहे. २०२४ मध्ये दिवाळखोरीचा अर्ज दाखल करेपर्यंत या कंपनीचे समभाग न्यू यॉर्क समभाग बाजारावर (SAVE) या संकेताखाली विकले जात असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →