स्नॅपचॅट

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

स्नॅपचॅटची निर्मिती त्इवान स्पीगल, बॉबी मुर्फी आणि रेगी ब्राउन या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थीयांनी सप्टेंबर २०११ मद्धे केली, स्नॅपचॅट द्वारे फोटो व्हिडिओ शेअर करता येतात, पोस्टद्वारे अनेक सदस्य एकमेकांना संदेश पाठवू शकतात, स्नॅपचॅटमध्ये वेगवेगळी फिल्टर्स उपलब्ध आहेत. यात फोटोची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, २४ तासांनंतर ते फोटो नाहीसे होतात. फेब्रुवारी 2018 पर्यंत स्नॅपचॅटमध्ये 187 दशलक्ष दैनिक सक्रिय वापरकर्ते आहेत. डिसेंबर 2012 मध्ये व्हिडिओ स्नॅप पाठविण्याची सोय उपलब्ध ॲपच्या माध्यमातून करून देण्यात आली, ॲपच्या आत फोटो बटण दाबून, लांबीच्या दहा सेकंदांचा व्हिडिओ कॅप्चर केला जाऊ शकतो. आणि एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ अदृश्य होतो. त्यानंतर १ मे २०१४ आलेल्या अपडेट नंतर यामद्धे व्हिडीओ चॅटद्वारे संवाद साधने तसेच थेट संदेश पाठवणे या सुविधा उपलब्ध झाल्या. त्यानंतर जुलै २०१४ मद्धे जिओ फिल्टर्स नावाची सुविधा उपलब्ध झाली यानुसार वापरकर्त्याला एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थानाला, शहराला, कार्यक्रमाला चित्रासोबत जोडता येऊ लागले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →