मीशो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मीशो

मीशो, ही एक भारतीय सामाजिक ई-कॉमर्स कंपनी आहे. याचे मुख्यालय बंगळूर, भारत येथे आहे. आयआयटी दिल्लीतून २०१५ मध्ये विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल पदवीधर झाले. त्यांनी स्थापन केलेली ही कंपनी आहे . ही कंपनी लहान व्यवसायिक व्यक्तींना व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल चॅनेलद्वारे त्यांचे ऑनलाइन स्टोअर सुरू करण्यास मदत करते.

२०१६ मध्ये वाय कॉम्बिनेटर साठी निवडल्या जाणाऱ्या तीन भारतीय कंपन्यांपैकी मीशो एक होती हा गुगल लाँचपॅडच्या पहिल्या बॅचचा एक भाग होता. जून २०१९ मध्ये, मीशो फेसबुककडून गुंतवणूक प्राप्त करणारा भारताचा पहिला स्टार्टअप बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →