हाइक मेसेंजर ही महाजालावर स्मार्टफोनवर चालणारी झटपट संदेश सेवा देणारी एक भारतीय सोशल मिडिया नेट्वर्किंग कंपनी आहे. यामद्धे मजकूर संदेशांव्यतिरिक्त, त्याचे वापरकर्ते ऑडिओ, प्रतिमा, फाइल, आवाज संदेश, व्हिडिओ आणि एकमेकांना ठिकाण पाठवू शकतात. २०१६ च्या आकडेवारीनुसार १०० मिलियन पेक्षा जास्त लोक हाइक मेसेंजरचा वापर करतात. भारती इंटरप्राइजेस आणि सॉफ्टबॅँक कॉर्पोरेशनतर्फे ‘हाईक’ ही मेसेंजर सेवा सुरू केली गेली होती, भारती इंटरप्राइजेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांचे पुत्र कविन भारती मित्तल हे या कंपनीचे संस्थापक आहेत. हाइक मेसेंजर ही सेवा जगातील २००हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हाइक मेसेंजर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.