ट्विटर (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे.
ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. संकेतस्थळ, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एसच्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाईव्ह फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.
ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषतः युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक २८० शब्दांची मर्यादा आहे.
ट्विटर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.