स्त्री अभ्यास केंद्र

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

१९७५ पासून जागतिक पातळीवर स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांचा मुद्देसूद अभ्यास याला ओळख प्राप्त झाली. त्या वर्षापासूनच भारतातही स्त्री अभ्यास ही एक वेगळी ज्ञानशाखा म्हणून अस्तित्वात आली.भारतीय समाजशास्त्रीय संशोधन समिती (ICSSR) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांनी संयुक्तपणे स्त्री अभ्यास या विद्याशाखेच्या विकासासाठी विद्यापीठीय व्यवस्थेत तिचा अंतर्भाव करण्याचे ठरवले. स्त्री अभ्यास विद्याशाखेचा NET व JRF कार्यक्रमात समावेश करण्यात आला.भारतात यूजीसीने मान्यता दिलेली ३४ स्त्री अभ्यास केंद्रे आहेत.

महाराष्ट्रात पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र आणि जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात व कोल्हापूर विद्यापीठात ‘स्त्री अभ्यास केंद्रे आहेत. मराठवाडा विद्यापीठात हेच काम करणारे ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →